सातारा जिल्ह्यात डेंग्यूची साथ आटोक्यात, डिसेंबर महिन्यात अवघे चार बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही महिन्यांपासून जिह्यात डेंग्यू साथीच्या आजाराने थैमान घातले होते. मात्र, महिनाभरापासून जिह्यातील डेंग्यू आटोक्यात आला आहे. डेंग्यूला रोखण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे यश आले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत जिह्यात डेंग्यूचे 203 रुग्ण आढळले होते. मात्र, डिसेंबर महिन्यात आजअखेर अवघ्या चार बाधितांना लागण झाली आहे. त्यामुळे डेंग्यू आजाराचा फैलाव कमी होत असल्याचे दिसून येते.

जिह्यात गेल्या महिन्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू, चिकुनगुणिया, मलेरिया या आजारांनी थैमान घातले होते. पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूसदृश यांची संख्या आटोक्यात येत नव्हती. मात्र, मागील काही महिन्यांत प्रशासनाच्या उपाययोजना अधिक गतीने राबविल्या. त्यामुळे साथीच्या आजारांचा फैलाव कमी झाला आहे. हिवताप कार्यालय व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दक्षता घेत घरोघरी जाऊन सर्व्हे केला होता. ज्या ठिकाणी रुमची संख्या अधिक आहे, त्या परिसरात आरोग्य विभागातर्फे तपासणी मोहीम राबवत धूर फवारण्याही केल्या होत्या. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाभरात साथीच्या आजारांनी बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळत आहेत, त्या ठिकाणी धूर फवारणी व अन्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत.