बुलढाणा – महिला नगराध्यक्षाच्या पतीला 80 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तक्रारदाराचे पत्नीस वारसहक्काने सफाई कामगार म्हणून नोकरीस लावण्याकरीता देऊळगावराजा नगर परिषदेच्या महिला नगराध्यक्षाच्या पतीने 80 हजार रूपये लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक बुलढाणा विभागाने कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारदार याने लाचेची मागणी करीत असल्याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक बुलढाणाकडे नोंदविली होती. सदर तक्रारीवरुन दिनांक 28 ऑगस्ट रोजी पडताळणी कार्यवाही केली असता आरोपी डॉ. रामदास शामराव शिंदे यांनी तक्रारदार यांस त्यांचे पत्नीस वारसहक्कांने सफाई कामगार म्हणुन नोकरीस लावण्याकरीता नगरपरीषद देऊळगाव राजा येथे नगराध्यक्ष असलेल्या पत्नीस सांगुन तक्रारदार यांचे पत्नीचा नावे ठराव घेऊन ठरावात नाव टाकण्याकरीता पंच यांचे समक्ष 80 हजार रुपयेची लाचेची मागणी केली आणि लाच स्विकारण्याची तयारी दाखवली. आज 4 सप्टेंबर रोजी रितसर सापळा रचून आरोपी डॉ.रामदास शामराव शिंदेला 80 हजार रुपये स्विकारून ती आरोपी क्र.2 प्रविण भगीरथ बन्सीले ( पर्सनल अॅसीस्टंट ) यांचेकडे दिले. आरोपी डॉ.रामदास शामराव शिंदे यांनी आपले नगराध्यक्ष असलेल्या पत्नीच्या पदाचा गैरवापर करुन स्वत: साठी पैश्याचे स्वरुपातील अर्थिक लाभ मिळविण्यासाठी न शोभनारे गैरवर्तन केल्याने त्यांचे विरुध्द कलम 7 (अ) लाच लुचपत प्रतीबंधक कायदा संशोधन 2018 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.