55 दिवसांत आचारसंहिता लागेल, कामाला लागा; देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी भाजपचा लोकसभा निवडणूकीचा मास्टर प्लान देखील सांगितला.

एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर भाजपच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. ‘लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिले नसून 55 दिवसांत आचारसंहिता लागेल’, असे फडणवीसांकडून सांगण्यात आले.

आमदारांना दिले नमो अॅपचे टार्गेट

देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघातून किमान 30 हजार नमो अॅप डाऊनलोड करण्याचे आदेश दिले आहेत. 25 जानेवारीपर्यंत राज्यभरात 50 लाख नमो अॅप डाऊनलोड करून घेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.