
नाशिकमध्ये येऊनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गैरहजर राहिले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव साहित्य संमेलनस्थळाला द्यायला लागू नये म्हणून कविवर्य कुसुमाग्रजांचे नाव संमेलनस्थळाला दिले गेले, असा दावा त्यांनी केला.
कवी कुसुमाग्रजही मोठेच आहेत; परंतु आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर सावरकर जेथे अपमानित होत असतील तेथे जाऊन तरी काय करायचे, असा खुलासा फडणवीस यांनी यावेळी केला. त्यांच्यासह महापौर सतीश कुलकर्णी आणि भाजपला संमेलनातून डावलले गेल्याने ते नाराज होते.
हेच गैरहजर राहण्याचे खरे कारण असल्याचे बोलले जात आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी फडणवीस आणि महापौर कुलकर्णी यांची पह्नवरून समजूत काढली होती, तरीही त्यांनी संमेलनाला येणे टाळले.



























































