देवणी येथे जिल्हा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

541

देवणी येथ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम फोडण्याचा अज्ञात दोघा चोरट्यांनी प्रयत्न केला. सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान केले. देवणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेचे शाखा व्यवस्थापक नारायण अरुणराव वलांडीकर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बँकेचे वॉचमन यांनी फोन करुन सांगितले की बँकेचे एटीएम फोडण्यात आले आहे. त्वरीत जाऊन पाहणी केली असता बँकचे एटीएम मशीन लोखंडी टॉमीने, पक्कडने अज्ञात दोघा चोरट्यांनी फोडून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. सदरील घटना बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अज्ञात दोघा चोरट्यांनी तोंडाला बांधून हे कृत्य केले. रात्री 12.10 ते 1.30 या कालावधीत ही घटना घडली. सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले म्हणून दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात दोघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या