
सामना ऑनलाईन । भोपाळ
काँग्रेसचे भोपाळचे उमेदवार व ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी आज राजगढ मतदारसंघातून मतदान केले नाही. सिंह हे भोपाळमधून निवडणूक लढत असल्याने तिथलाच रेकॉर्ड ठेवण्यात ते एवढे व्यस्त होते की त्यांनी राजगढला जाऊन मतदान करणे टाळले. यावरून नेटकऱ्यांनी दिग्गीराजांची सोशल मीडियावर फिरकी घेतली आहे.
दिग्विजय सिंह यांनी मतदान केले नसल्याचे स्वत: प्रसारमाध्यमांना सांगितले. ‘मला फार वाईट वाटतंय की मी राजगढला जाऊन मतदान करू शकलो नाही. मात्र पुढच्या वेळेस मी माझं नाव भोपाळच्या मतदारयादीत नोंदवून घेईन’, असे सिंह यांनी सांगितले. दरम्यान सिंह यांनी मतदान न केल्याचे जाहीर केल्यानंतर नेटकऱी त्यांच्यावर तुटून पडले आहेत. ‘जी व्यक्ती स्वत: निवडणूक लढवतेय ती मतदान करत नाही ही फार शरमेची बाब आहे’, अशा शब्दात नेटकऱ्यांनी त्यांना फटकारले आहे.
























































