दिलीपकुमार यांनी विकासकाविरोधात ठोकला 200 कोटींचा मानहानीचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी समीर भोजवानी या विकासकाविरोधात तब्बल 200 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोजवानी दिलीपकुमार यांच्या वांद्रे येथील बंगल्यावर आपली मालकी असल्याचा दावा करत आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारे त्यांची बदनामी करत आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी भोजवानीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसेच तत्काळ माफी मागावी अशी मागणी केली आहे.

वांदे पाली हिल येथे दिलीपकुमार यांच्या मालकीचा 250 कोटी रुपयांचा बंगला आहे. मात्र सदर बंगल्यावर आपली कायदेशीर मालकी असल्याचा दावा भोजवानी यांनी केला होता. त्याबाबतची नोटीसही दिली होते. दरम्यान, बनावट कागदपत्रांच्या अधारे भोजवानी आपला बंगला हडपण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही सायरा बानो यांनी केला आहे. तसेच याबाबत त्यांनी दिलीपकुमार यांच्या टिवटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत न्याय देण्याची मागणी केली होती.