
‘तमाशा’, ‘रॉकस्टार’ आणि ‘अमर सिंग चमकिला’ यांसारख्या अभूतपूर्व चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. चित्रपटाची कथा सांगण्याची इम्तियाज यांची एक खास शैली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या चित्रपटांना एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे. प्रेक्षक त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इम्तियाज ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्यास सज्ज आहेत.
इम्तियाज अली यांच्या चित्रपटाची मांडणी अनोखी असल्याने, हा चित्रपट प्रेक्षकांना साद घालतो. मै वापस आऊंगा या चित्रपटाची कथा दिलजीत दोसांझच्या पात्राभोवती फिरते. दिलजीतच्या आजोबा मृत्यूशैय्येवर असताना काय घडते याचे चित्रीकरण या चित्रपटामधून केले आहे. भावभावनांचे कंगोरे या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात वेदांग रैना आणि शर्वरी वाघ भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वीच्या काळात दिसतात.
नसीरुद्दीन शाह आणि दिलजीत त्यांच्या पहिल्याच लूकमधून प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यांचे संवाद आणि संभाषणे खरोखरच मनमोहक आहेत. हा चित्रपट अर्थातच एक प्रेमकथा आहे, पण नेहमीप्रमाणेच इम्तियाज खानचा ट्विस्ट यात एक वेगळेपण आणणार आहे. चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांनी दिले असून, गीते इरशाद कामिल यांनी लिहिली आहेत. हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. ‘अमर सिंग चमकिला’नंतर इम्तियाज खान आणि दिलजीत यांचा हा दुसरा चित्रपट आहे.

























































