टॉपचा कलावंत

527

>> मिलिंद शिंदे

राजेश देशपांडे. वडिलांची शिकवण पक्की ध्यानात ठेवूनच संघर्षाला सुरुवात केली आणि झपाटल्यागत मिळेल त्या संधीचं सोनं करीत गेला…

दादा कोंडकेंना त्यांच्या सहकाऱयाची ढोलकीवर नजरबंदी करत  थिरकणारी बोटं भावली मनापासून. त्या सहकाऱयाच्या ‘हुनर’नं ते प्रभावीत झाले. तरीही त्यांनी त्यांच्या त्या सहकाऱयाला दटावून सांगितलं की, ‘आधी शिक्षण पूर्ण कर मग ये.’
दादांची आज्ञा मानून तो सहकारी निघाला तो थेट राजापूर या आपल्या गावी पोहोचला. स्वतः शिकलाच पण नंतर गावोगावी शाळा सुरू करून दुर्गम भागापर्यंत शिक्षणाचा झरा पोहोचवण्याचं काम सुरू केलं. जोडीला त्यांची पत्नी होतीच आणि या जोडीनं दूर-दूर जाऊन शाळा सुरू केल्या. ती घडी बसली की पुढच्या गावात जा, शाळा सुरू कर… जणू त्यांना त्याचा ध्यासच लागला होता आणि अशा  दांम्पत्याचा मुलगा म्हणजे आजचा आघाडीचा लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे.
चंद्रकांत देशपांडे (चंदूभाई) आणि आई यांचा प्रभाव, संस्कार राजेशच्या वागण्या बोलण्यात सतत झिरपत असतो. चंदूभाई स्वतः उत्तम नट.  तर आई शास्त्र्ााsक्त दृष्टिकोन असलेली स्त्र्ााr… आणि दोघांना राष्ट्र सेवा दलाची पाश्वभूमी. त्याच चळवळीत भेट झाली आणि विवाह बंधनात स्वतःला गुंफून घेतलं…
‘गुंड हो पण टॉपचा गुंड हो’ (अगदीच शब्दशः नाही) पण चंद्रकांतजींना वाटायचं की, जे काही करशील त्यात टॉपचा होशील, याची खबरदारी घे. आपल्या पिताश्रींचं हे वाक्य राजेश स्वतः म्हणतो तेव्हा त्याचा घुमार त्याचा अर्थ आणखी ध्वनित करतो… बालपणी दोन चमच्यांना घेऊन त्यांच्या वरच्या (चेहऱयासारख्या दिसणाऱया) भागांना एकमेकांसमोर धरून त्यांच्यात संवाद घडवून नाटय़ निर्माण करणे हा राजेशचा बालपणीचा छंद. तो त्याला आजही लेखक म्हणून प्रेरणा देतो. ‘रचणं’ म्हणजे काय हे तो बालपणापासूनच्या त्याच्या या छंदातून शिकत आला, ते तो आजतागायत फॉलो करतो…या रचण्याच्या ध्यासानं मुंबई खुणावू लागली.

वडिलांचं प्रोत्साहन होतंच. राजेशनं राजापूरहून मुंबई गाठली.

माणूस आला आणि मुंबईत त्याचं स्वागत झालं नाही असं कधीच होत नाही… मुंबईकडून स्वागत करवून घ्यावं लागतं… तीच गोष्ट राजेशची. सगळंच नवीन. भांबावून जायला होतं… पण कलाकाराकडं मुद्दलात असलं की त्याला व्याज कमवून मुद्दलही वसूल करता येते. ‘अरे जोगवा कसला?… फुगवा तिला…’
‘झुलवा’ नाटकात जगनीला चिडवण्यासाठी काही वाक्य इंप्रोवाईज करण्याची तालीम जेव्हा सुरू होती आणि राजेशनं एक वाक्य इंप्रोवाईज केलं, ते हे होतं आणि मग ते नाटकाच्या संवादाचा भाग बनून गेलं ते आजतागायत आहे… भारत तांडेल. एकेकाळचं रंगभूमीवरचं मोठं नाव. त्यांनी राजेशला अचूक हेरलं आणि एका नाटकासाठी विचारणा केली… राजेश जवळची ‘कुमक’ सर्व अर्थानं संपत आली होती. अगदी राहण्यापासून ते हात खर्चापर्यंत … राजेशनं तांडेलना ‘नाही जमणार’ म्हणून सांगितलं.
का? तांडेलचा प्रश्न…‘राहण्याचा आणि सगळाच…तांडेल धडाडीचे. त्यांना राजेश हवा होता.त्यांनी राजेशची निकड जाणली आणि संपवलीही…मोहन पिल्ले… राजेशच्या पटातलं महत्त्वाचं नाव. राजेश यांच्याबद्दल बोलताना ओतप्रोत आदराने बोलतो… पिल्ले भारत तांडेलांचे सहकारी, पण झाले राजेशचे दोस्त. राजेशनं त्यांच्यासोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी राहायला सुरुवात केली… एक दिवस लाजत बुजत राजेशनं ‘भाडं किती देऊ?’ असा प्रश्न विचारला. तर मोहन पिल्ले यांनी एक खमंग शिवी देत हा विषय परत काढायचा नाही असं सांगितलं. असं फार कमी घडतं मुंबईत… राजेशला हवं ते स्थैर्य मिळाल त्यावेळेसच… राजेश झपाटल्यासारखा काम करू लागला.

छबीलदासच्या गल्लीत काय नाही घडलं…? आणि कोण नाही घडलं? अवघी मराठी रंगभूमी उभी केली या चळवळीनं. विद्याधर पाठारे आणि राजेश त्या गल्लीत भेटले. त्यांना नवीन काहीतरी करायचं होतं. राजेशनं त्यांना दोन तीन लेखकांच्या कांदबऱया थोडक्यात ऐकवल्या आणि एक स्वतःला सुचलेली कथा पण सांगितली. सगळं ऐकल्यावर पाठारे म्हणाले बाकी ठीक आहे. तू जे लिहिलंस त्यावर काम करायला लाग. आपण ते करतोय. ती मालिका होती रसिकांना वेड लावणारी ‘गंगूबाई नॉन मॅट्रिक’. गंगूबाईनं तुफान यश मिळवलं आणि राजेशचं नाव लेखक-दिग्दर्शक म्हणून कर्णोपकर्णी झालं. राजेश मूलभूत गरजांत स्थिरावला… आता त्याला यशाकडं जायचं होतं तो निघाला… पत्नी स्मृतीची समर्थ साथ होतीच… त्याही एकेकाळी अभिनय करत असत. पण एक चाक चाललं पाहिजे म्हणून त्यांनी राजेशच्या सहकाऱयांची भूमिका घेतली. राजेश त्यांना खूप मानतो. प्रायोगिक रंगभूमीवरचा  अभिनेता गिरीश साळवी राजेशला भेटला. त्याच्या डोक्यात राजन खान यांची ‘युद्ध’ नावाची कथा घोळत होती आणि त्यावर सिनेमा व्हावा अशी गिरीशची इच्छा होती. ती फळास आली ‘धुडगूस’ या सिनेमाच्या निमित्तानं. ‘धुडगुस’ खूप गाजला.  तोवर राजेश बऱयाच पुरस्कार सोहळय़ाचे स्क्रिप्टस् लिहायला लागला होता. एक दिवस मिस्टा ऍर्वार्डच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी एक कथासूत्र ऐकवलं… ते भन्नाट होतं. त्यातून जन्म झाला ‘करून गेलो गाव’ या व्यावसायिक रंगभूमीवर पुरस्कारांसकट यश मिळवलेल्या नाटकाचा…
राजेश आणखी स्थिरावला… विचारही विस्तारला आणि लिहू लागला मनसोक्त. त्यातून त्याच्या ‘पायरव’ या काव्यसंग्रहाचा जन्म झाला.

सध्या तुफान गाजत असलेलं ‘हिमालयाची सावली’ या नाटकात राजेशनं सर्वस्व ओतलं आहे. खूप मेहनत घेतली आहे आणि त्याचा परतावा प्रेम आणि यश तो दर प्रयोगाला अनुभवतो आहेच. अर्थात शरद पोंक्षे आणि गोविंद चव्हाण यांची साथ आहेच…
राजेश आपण बोलताना तुझ्या तोंडून एक शेर निघून गेला तो खरा आहे दोस्ता.
‘अगर किसी चिज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशीश मे लग जाती है.’
मित्रा तुला शासकीय सेवेत ‘वरिष्ठ लिपिकाची’ नोकरी लागली होती आणि कायम व्हायच्या दिवशीच तू ती सोडलीस… बरं झालं. नाही तर आम्हाला राजेश देशपांडे कसा मिळाला असता!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या