11वीच्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिका पळून गेली, लॉकडाऊनमध्येही रोज 4 तास घेत होती शिकवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिकवणी घेणारी एक शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हरयाणातील पानिपतमध्ये ही घटना घडली आहे. विद्यार्थी हा 11वीत शिकत असून तो 17 वर्षांचा आहे. असं बोललं जातंय की त्याचं आणि शिक्षिकेचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं आणि म्हणूनच दोघे पळून गेले. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत त्यांच्या मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. शिक्षिकेच्याही वडिलांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलंय की त्यांचा मुलगा शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात होता. 29 मे रोजी तो दुपारी 2 वाजता शिकवणीसाठी गेला होता. तो उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधाशोध करायला सुरूवात केली होती. शिक्षिकेच्या घरच्यांना मुलाचा ठावठिकाणा माहिती आहे का ? असं विचारलं असता त्यांनी बराच वेळ काहीच सांगितलं नव्हतं. अखेर शिक्षिकेच्या वडिलांनी पोलिसांत त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी शिक्षिकेविरोधात विद्यार्थ्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दोघे कुठे आहेत हे त्यांच्या मोबाईलचा माग काढून जाणण्याचा पोलीस प्रयत्न करत होते, मात्र दोघांचे मोबाईल बंद आहेत. शिक्षिका ही घटस्फोटीत असून तिने तिच्या माहेरी राहात होती. अर्थार्जनासाठी तिने घरातच शिकवणी घेण्याचं ठरवलं होतं. शिक्षिकेसोबत गायब झालेला विद्यार्थी हा तिच्या घरी शिकवणीसाठी जात होता. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असताना हा विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी रोज 4 तास शिकवणीसाठी जात होता. या दोघांनी पळून जाताना घरातून काहीही सामान घेतलेलं नाहीये आणि यामुळे पोलीस चक्रावले आहेत.

विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या अमेरिकेच्या शिक्षिकेला अटक

एका शिक्षिकेचा 17 वर्षाच्या विद्यार्थ्यावर जीव जडला. दोघांनीही आपले प्रेमप्रकरण मान्य केले असून पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे राहणाऱ्या एबी डिब्स (35) या शिक्षिकेचे तिच्या एका माजी विद्यार्थ्यावर प्रेम होते. या दोघांनी बऱ्याच वेळा अनैतिक संबंधही ठेवले होते. या माजी विद्यार्थ्याला या शिक्षिकेने विस्कॉन्सिन हायस्कूलमध्ये शिकवले होते. तिथेच त्यांचे प्रेम जुळले होते. याबाबात शाळेतील इतर शिक्षकांनीही तिच्याविरोधात विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याबाबत तक्रार केली होती.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या या शिक्षिकेला अटक केली असून तिला कोलंबियातील काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्याशी अनैतिक संबंध ठेवल्याबाबत आरोपी शिक्षिकेला 12 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस प्रकरणाचा शोध घेत असून पीडित विद्यार्थ्याप्रमाणे अजून कोणी विद्यार्थी या शिक्षिकेच्या जाचाला बळी पडले आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.

शिक्षिका एबी डिब्सने तिचा गुन्हा मान्य केला असून विद्यार्थ्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचेही सांगितले आहे. तसेच माजी विद्यार्थ्याने त्याचे शिक्षिकेसोबत प्रेमप्रकरण असल्याचे मान्य केले आहे. तसेच एबी डिब्स आता पोर्टेज कम्युनिटी स्कूल डिस्ट्रिक्ट या शाळेत शिकवत नाही तसेच तिच्या शिक्षकी पेशापासून कशी दूर झाली याबाबत शाळेतील अधिकाऱ्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.