दिवाळी अंक – मायबोली

साप्ताहिक मायबोलीचा यंदाचा दिवाळी अंक संपूर्ण कथा साहित्य प्रकाराला वाहिलेला आहे. पर्यावरण रक्षणाचे भान ठेवून आपली जबाबदारी कशी पार पाडावी याची माहिती देणारा ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे’ हा लता बोरोले यांचा लेख अंकाची उत्कृष्ट सुरुवात करतो. विषयांमध्ये वैविधता या अंकाच्या वाचकांना पूर्ण आनंद देणारी ठरेल. स्नेहल धेरडे यांचा हम्पी, भाऊराव घाडीगावकर यांचा मोडी लिपीचे जनक, वैष्णवी डुमरे यांचे बाहुल्यांचे स्नेहसंमेलन याशिवाय एक अकेली छत्री मे, एक नजर प्रकाशाकडे, पश्चात्ताप, सावली, दिल क्या करे, मॅरेज फॉर अॅग्रीमेंट, घोडचूक, शब्दखेळ या कथा वाचनानंद देतात. नंदा आचरेकरांची माझी पहिली शॉर्टफिल्म, सुभाष सुंठणकर यांचे बातमीचे महाभारत, सुंदर मी होणार, गेले द्यायचे राहुनी, प्रेम, लगीन, मानव आणि निसर्ग, दुरावा, खेळ अंकांचा या कथाही वाचनीय आहेत.

संपादक – विवेक मोरे, मूल्य ः 100 रुपये.

श्री अक्षरधन

श्री अक्षरधनचा यंदाचा 28 वा दिवाळी अंक आहे. कथा, व्यक्तीविशेष, दंतकथा, कविता असा साहित्याचा अमूल्य ठेवा घेऊन श्री अक्षरधनचा अंक वाचकांच्या भेटीला आला आहे. ‘जिथं डोपं ठेवावे असे पाय गेले’ हा डॉ. रा. ज. गुजराथी यांच्यावर आधारित प्रसाद पुलकर्णी यांचा लेख वाचनीय आहे. याबरोबरच अंकात स्त्र्ााr संतांचा भक्तीमार्ग, मनोहर पर्रीकर-गोव्याचे विकासपुरुष, वात्सल्याचा मूर्तिमंत झरा-गिरिजा कीर, शोकनाटय़ाची महानायिका, स्वप्नांचे मोर व्हावे, मनाच्या गाभाऱयातील एक हळवं झाड, शिक्षकांना पत्र, कृतज्ञतेचे मोल, ग्रंथ आमचे साथी, ट्रेन, संध्या आलमेलकर, चतुरस्र गायकीचा बादशाह-मन्ना डे अशा लेखांचे दर्जेदार साहित्य वाचकांच्या भेटीला आले आहे. याशिवाय अरुण म्हात्रे, प्रसाद कुलकर्णी, संगीता अरबुने, कीर्ती पाटसकर, जनार्दन पाटील यांसह लोकप्रिय कवींच्या कविता वाचायला मिळतील.

संपादक – सरिता गुजराथी, मूल्य – 120 रुपये.

साहित्य संगम

साहित्य विश्वात 25 वर्षांहून अधिक काळ घट्ट पाय रोवून असलेल्या साहित्य संगमच्या वाचकांसाठी या वर्षीही हा अंक साहित्यिक फराळाची मेजवानी घेऊन आला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरही वैचारिक साहित्याचा ठेवा या अंकात उलगडणार आहे. अंकात विविध वैचारिक मंथन करणारे परिसंवाद, शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारे गणिताचा पाया भक्कम करण्याची गरज, टेक्नोस्मार्ट शिक्षकांची गरज, नैराश्यावर करूया मात, हे जगणे आनंदाचे, आजची पिढी आणि आधुनिक तंत्रज्ञान, संघर्ष करा आणि भरारी घ्या हे लेख आहेत. कोरोनानंतरचे जग या विभागात अभिजित फडणीस यांचा वेध बदलत्या अर्थकारणाचा, यंत्रावर विश्वास वाढवणारे दिवस, आगामी काळ टेलीमेडीसीनचा, शुभांगी पुलकर्णी यांचा कार्यशैली बदलण्याची गरज, ही केवळ सुरुवात, अजित अभ्यंकर यांचा जाग यायला हवी हे लेख लक्षवेधी आहेत. याशिवाय कविदालनात मोरपिसांचे अंपुर, शुक्रचांदणी, मातृमहती, पावसाळी मार्लेश्वर, कोविड 19 साथीची हवा या कविता वाचनीय आहेत. विशेष लेखामध्ये चळवळीच्या वाटचालीत व्यक्तीगणिक दानत आणि दातृत्व यांचा अनुभव सांगणारा लेखही महत्त्वाचा आहे.

संपादक – उमाकांत वाघ, मूल्य – 200 रुपये.

आपली प्रतिक्रिया द्या