
अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का की, तीही देवेंद्र फडणवीस चरणी गहाण ठेवलीय?, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७० वर्षात कॉंग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले होते. यावरूनच त्यांनी X वर एक पोस्ट करत अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
हर्षवर्धन सकपाळ म्हणाले आहेत की, “देवेंद्र फडणवीस यांनी आज ७० वर्षात कॉंग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले. यावेळी तिथेच बसलेल्या अशोकरावांना हा स्वतःचा अपमान वाटला नाही का? स्वतःचा जाऊद्या पण आपल्या वडिलांबद्दल कोणी बोललं तर कोणताही मुलगा हे कसं ऐकून घेईल? अशोकरावांना हा स्व. शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान वाटला नाही का? की आपण एवढी लाचारी पत्करलीय की वडीलांचा अपमानही तुम्हाला क्षुल्लक वाटतोय.”
ते म्हणाले, “आम्ही गर्वाने सांगू शकतो, स्व. शंकरराव चव्हाण साहेब कॉंग्रेसचे नेते होते आणि त्यांनी स्वातंत्र्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आणि नांदेड जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली.”
अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का की तीही देवेंद्र फडणवीस चरणी गहाण ठेवलीय?
देवेंद्र फडणवीस यांनी आज ७० वर्षात कॉंग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले. यावेळी तिथेच बसलेल्या अशोकरावांना हा स्वतःचा…
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) January 7, 2026


































































