
सामना ऑनलाईन । भिवंडी
मोकळ्या मैदानात खेळत असताना चार चिमुकल्यांवर हल्ला करत भटक्या कुत्र्याने त्यांचा चावा घेतल्याची घटना भिवंडीच्या गुलजारनगर येथे घडली. अयान मोमीन (4), सिद्दीक शेख (7), जिकरा मोमीन (6), जाहिद मोमीन (5) अशी जखमी मुलांची नावे आहेत.
शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून गेल्या तीन दिवसांत दहा जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या काढत्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे काताकरण पसरले आहे. भिकंडी पालिका प्रशासनाने पाच वर्षांत श्कान नसबंदी कार्यक्रम राबकून 23 हजार 612 कुत्र्यांची नसबंदी केली होती. त्यासाठी 2 कोटी 48 लाख 3 हजार 530 रुपये खर्चही केला. मात्र तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे. दरम्यान श्वान नसबंदीचा उपक्रम बारगळला असून शहरात अजूनही 12 हजार भटके कुत्रे असल्याची माहिती समोर आली आहे.
























































