मुंबईत चोर गावात थोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँकेत नोकरी लावून देतो, म्हाडाची घरे स्वस्तात मिळवून देतो, असे सांगून सर्वसामान्यांकडून कोटय़वधींची माया जमवणाऱ्या ठकसेनने अनोखा दानशूरपणा केल्याचे समोर आले आहे. एकीकडे नागरिकांना फसवून पैसे कमावलेल्या प्रशांत बडेकर याने गावातील शाळेत दहा टॅब दिले. या दातृत्वाचे बॅनर लावून स्वत;ची पाठ भामटय़ाने थोपटून घेतली. ठाणे खंडणीविरोधी पथकाने बेडय़ा ठोकताच या भामटय़ाचा ‘झोलझाल’ समोर आला. त्याच्यावर 17 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्यातील 9 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून ‘मुंबईत चोर गावात थोर’ या उक्तीचा त्यामुळे प्रत्यय आला आहे.

सातारा येथील शिरवळ पोलीस ठाण्यात बेबीताई सोळेकर यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी कल्याण येथील टावरीपाडा परिसरात राहणारा प्रशांत बडेकर ऊर्फ अरविंद सोनटक्के याने त्यांच्यासह इतर 16 जणांना मुंबईतील म्हाडा गृहसंपुलात स्वस्त दरात घर मिळवून देतो, अशी बतावणी केली होती. तसेच रिझर्व्ह बँकेत क्लार्प पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एक कोटीचा चुना लावला होता. त्यानंतर पुठलेही घर मिळवून न देता अथवा नोकरीही दिली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपुमार कोथमिरे, पोलीस निरीक्षक व्ही. एस. घोडके, पोलीस हवालदार सुरेश मोरे यांच्या पथकाने तपास करून प्रशांत याला अटक केली. वृत्तपत्रातील जाहिराती पाहून तो नागरिकांना फसवत होता. त्यातून मिळणाऱया लुटीतून संगमनेर येथील शाळेला टॅब दिल्याचे बॅनर त्याने वायरल केले.