‘क्रिकेटसम्राट’ डॉन ब्रॅडमन यांच्या ‘त्रिशतकी’ ऐतिहासिक बॅटचा होणार लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘क्रिकेटसम्राट’ आणि ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन यांनी 1934 च्या अॅशेस मालिकेत वापरलेल्या बॅटचाही आता लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. याच बॅटने ब्रॅडमन यांनी कसोटीतील आपले त्रिशतक झळकावले होते. ‘एबीसी.नेट.एयू’च्या अहवालानुसार ब्रॅडमन यांची पहिली बॅट लिलावात 1 लाख 10 हजार डॉलरना विकली गेली होती.

1934 च्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेत सर डॉन ब्रॅडमन यांनी वापरलेली ऐतिहासिक बॅट मात्र 1999 पासून एनएसडब्ल्यू दक्षिणी हायलॅण्ड्सच्या बोरालमधील ब्रॅडमन संग्रहालयात क्रिकेटशौकिनांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. याच बॅटने ब्रॅडमन यांनी हेडिंग्लेत  304  आणि ओव्हल कसोटीत 244 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. त्यांनी 1934 च्या या मालिकेत सलामीवीर  बिल पोन्सफोर्ड याच्या साथीने ऑस्ट्रेलियासाठी 451 धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीसाठीही ब्रॅडमन यांनी हीच बॅट वापरली होती. 1934 च्या अॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी 758 धावांचा पाऊस पाडला होता.