डॉ. अरुण पाटकर यांचे निधन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण श्रीरंग पाटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विभावरी, मुली डॉ. तृप्ती चौगुले, स्वप्ना वेदक, मुलगा अमेय, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. मूळचे मालवण रेवंडीचे असणारे डॉ. पाटकर यांनी जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मुंबई महानगरपालिका सेवेत रुजू झाले. पालिकेच्या आरोग्य विभागात एक प्रामाणिक अधिकारी आणि कुशल प्रशासक म्हणून ठसा उमटवला होता.