
विशाल अहिरराव
नाशिक येथे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. सकाळी शहरातून ग्रंथदिंडी निघणार आहे. संमेलनस्थळी सकाळी 11 वाजता ध्वजारोहण होईल. मुख्य मंडपात दुपारी 4.30 वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र, या सोहळ्याला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची हजेरी लागण्याची शक्यता कमी आहे.
संमेलनाच्या आयोजन समितीचे त्यांना नाशिक येथे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. नारळीकर हे अनुपस्थित राहतील अशी शक्यता आहे. नारळीकरांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात येणार अशी माहिती मिळत आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. नारळीकर यांना नाशिक येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे.































































