डॉ. मनमोहन सिंग यांना एम्समधून डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना उपचारानंतर दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मधून रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना 13 ऑक्टोबर रोजी प्रकृति अस्वास्थ्यामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यांना अशक्तपणा वाटत असल्याची तक्रार त्यांनी डॉक्टरांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतीच या महिन्याच्या सुरुवातीला एम्स रुग्णालयाला भेट देऊन डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.