
हिंदुस्थानच्या पहिल्या महिला हृदयरोगतज्ञ डॉ. पद्मावती शिवरामकृष्ण अय्यर यांचे शनिवारी निधन झाले. त्या 103 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर नॅशनल हार्ट इन्स्टिटय़ूट (एनएचआय) येथे गेल्या 11 दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि व्हेेटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
एनएचआयच्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ. पद्मावती यांना सन 1967 मध्ये पद्मभूषण तर सन 1992 मध्ये पद्मविभूषण विताबाने गौरविण्यात आले होते. हार्वर्ड मेडिकल इंटरनॅशनल अकॉर्ड, डॉ. बी. सी. रॉय अकॉर्ड, कमला मेनन रिसर्च पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
डॉ. पद्मावती या अविवाहित होत्या. रंगून मेडिकल कॉलेज आणि इंग्लंडमधून मेडिसीनमध्ये डिग्री घेतल्यानंतर सन 1950 पासून त्या दिल्लीच्या वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय होत्या. त्या दिल्लीत आल्या. सुमारे 70 वर्षे त्यांनी आपले आयुष्य वैद्यकीय क्षेत्र आणि रुग्णसेवेसाठी वाहून घेतले होते.



























































