दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट! एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोरोनाची दुसऱया लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र अद्यापही रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण चिंताजनकच आहे. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी तिसऱया लाटेची शक्यता वर्तवलेली  आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेवर भारतीय आयुर्विज्ञान संस्थान  (एम्स)चे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर कोरोना नियमावलींचे पालन केले नाही तर कोरोनाची तिसरी लाट दोन महिन्यांत येऊ शकते. गुलेरिया यांच्या इशाऱयाने गांभीर्याने घेणे, आवश्यक आहे.

एम्सचे संचालक डॉ. गुलेरियाने म्हटले की, आतापर्यंच्या रिसर्चमध्ये असे कोणतेही पुरावे मिळालेले नाही की, कोरोनाची तिसरी लाट प्रौढांपेक्षा लहान मुलांना प्रभावित करेल. यापूर्वी हिंदुस्थानच्या महामारी विशेषज्ञांनी पहिल्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. देशात एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यावधीत कोरोनाची दुसरी लाट हिंदुस्थानात पिकवर पोहोचली होती. या दरम्यान देशात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंमध्ये विक्रमी वाढ नोंदवण्यात आली होती. जास्तीत जास्त राज्यांमध्ये या काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या केस कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात एक महिन्याच्या आत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट डेल्टा प्लसमुळे येईल. राज्याच्या कोविड टास्क फोर्सने या महामारीच्या आढावा बैठकीमध्ये ही माहिती दिली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेडिकल टीम आणि इतर अधिकाऱयांना आवश्यक उपकरणांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले.

तिसरी लाट रोखण्याचे 4 उपाय

  • हिंदुस्थानात जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करावे लागेल.
  • लोकांना कोविड गाइडलाइन्सचे पालन करावे लागेल.
  • अशा परिसरांचे मॉनिटरिंग करावे लागेल, जेथे कोरोनाची प्रकरणे झपाटय़ाने वाढत आहेत.
  • जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 5टक्यांपेक्षा जास्त आहे, तेथे कंटेनमेंट क्षेत्र घोषित करावे लागेल.
  • महाराष्ट्रात 2 ते 3 आठवडय़ांच्या आत तिसरी लाट येण्याचा अंदाज

  • महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कमी झाला असून दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर पोहचला आहे. राज्यात अनेक जिह्यात अनलॉक करण्यात आले असून तुरळक ठिकाणी 5 टक्क्यांवर पॉझिटिव्ही रेट आहे. दिवसभरात 9 हजार 798 नवे रुग्ण आढळले असून 14 हजार 347 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 2 कोटी 70 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
  • हिंदुस्थानात दुसऱया लाटेचा कहर ओसरला तरी मात्र तिसऱया लाटेची चिंता सुरू झाली आहे. देशात दुसऱया लाटेतील नव्या बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत 60 हजार 753 नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 7 लाख 60 हजार 19 वर पोहोचली आहे.
  • हिंदुस्थानात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत 27 कोटींहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशात गेल्या 24 तासांत 33 लाख 85 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी 29 लाख 13 हजार 219 जणांनी पहिला डोस घेतला, तर दुसरा डोस घेणाऱयांची संख्या तीन लाख 86 हजार 866 इतकी आहे.