डॉ. सुहास वारके नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख डॉ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची संभाजीनगर येथे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली व ते तेथे रूजू ही झाले आहेत. काल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबईत कार्यरत असलेल्या डॉ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्तीचे आदेश निघाले होते. तुरूंग विभागाचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती अपेक्षित धरली जात होती. परंतु ऐनवेळी जाधव यांच्या ऐवजी वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नांदेड चे भुमिपुत्र तथा मुंबई येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस आयुक्त रावसाहेब शिंदे यांची पुणे येथे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.