डॉ. वैभव देवगिरकर ‘गोवा सोशल आयकॉन अवॉर्ड’ने सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वयं कला संघ गोवा आणि समाज कल्याण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे उपलब्ध करून देणाऱया डॉ. वैभव देवगिरकर यांना ‘गोवा सोशल आयकॉन अवॉर्ड 2026’ ने गौरविण्यात आले. पणजी येथील मेवेझेस ब्रिगेन्झा सभागृह येथे आयोजित समारंभात आमदार प्रेमेंद्र शेठ, आमदार रुडॉल्पह् फर्नांडिस, प्रा. डॉ बी. एन. खरात उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि गोवा आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.