‘दृश्यम 2’ची झेप 300 कोटींच्या क्लबमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरू आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. त्याला पहिल्या दिवसापासून दमदार प्रतिसाद मिळत आहे. आता तर ‘दृश्यम 2’ ने 300 कोटींच्या क्लबमध्ये झेप घेतली आहे.

‘दृश्यम 2’ ने वर्ल्डवाईड 303 कोटी रुपये कमाई केली आहे.  अशी कामगिरी करणारा हा या वर्षातील तिसरा सिनेमा ठरला आहे. याआधी ‘ब्रह्मास्त्र्ा’ने 431 कोटी, ‘द कश्मीर फाइल्स’ने 341 कोटी आणि ‘दृश्यम’ने 303 कोटी कमावले आहेत. पाचव्या आठवडय़ातही  ‘दृश्यम 2’ ची घोडदौड सुरू आहे. ‘गोलमाल 2’ नंतर अजय देवगणचा हा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.