
दुर्गा सप्तशतीचा पाठ हा देवी दुर्गाच्या स्तुती, महिमा आणि क्रमाचे वर्णन करणारा 700 श्लोकांचा एक पवित्र ग्रंथ आहे. मुख्य 13 अध्याय सुरू करण्यापूर्वी खालील क्रमाने पाठ करावा ः शापोद्धार व उत्कीलन, दुर्गा कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, 13 अध्यायांचे नऊ दिवसांत विभाजन करून किंवा रोज आपल्या श्रद्धेनुसार वाचन करावे. पूर्ण झाल्यानंतर सिद्ध पुंजिका स्तोत्र, आरती आणि क्षमा प्रार्थना करावी.
























































