जम्मू कश्मीरमध्ये भूकंपाचे झटके, घाबरून लोक पडले घराबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमध्ये गुरूवारी दुपारी भूकंपाचे झटके जाणवले. हा भूकंप ३.७ रिश्टरचा होता त्यामुळे या भागातल्या घरांच्या भिंती हलल्या. भूकंपामुळे जमीन हलायला लागली, भितीमुळे लोक आपल्या घरातून बाहे पडले. स्थानिक लोकांनी घराबाहेरच थांबावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

दुपारी तीनच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकपांच्या धक्क्यांमुळे घराचे दरवाजे आणि खिडक्या जोरदार हलू लागल्या. या धक्क्यांमुळे अनेक घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. स्थानिक प्रशासनाने घराबाहेरच थांबहण्याचे आवाहन केले असून या घटनेत कुठलीही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाही.