अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची ईडी चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील कोट्यवधींच्या कोळसा चोरी घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी केली. रुजिरा मुलाला सोबत घेऊन सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात पोहोचल्या. बँकॉकमधील खात्यातून केलेल्या काही व्यवहारांबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली. यापूर्वी सीबीआयनेही त्यांची दोनदा चौकशी केली.