ईडीकडून मुंबईत हिंरानंदानी समूहाच्या कार्यालयावर छापेमारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी हिरानंदानी समूहाच्या चार ठिकाणी छापेमारी केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रातील हिरानंदानी हा मोठा ग्रूप आहे आणि त्याच्यावर आता ईडीकडून छापेमारी केली जात आहे. पहाटेपासून त्याच्यावर कारवाई केल्याची माहिती आहे. फेमा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने एक केस बनवली आहे. याच अनुशंगाने मुंबई, ठाणे, कल्याण येथे हिरानंदनी समूहाच्या मुख्यकार्यालये आहेत तिथे ईडीचे अधिकारी झडती घेण्यासाठी पोहोचले आणि पहाटेपासून छापेमारी सुरु आहे.