कितीही त्रास दिला तरी शिवसेना डगमगणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘केंद्रातील लोकांविरुद्ध जे बोलतात, त्यांची जुनी प्रकरणे मुद्दाम बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. पण कोणी कितीही त्रास दिला, अडचणी आणल्या, तरी शिवसेना डगमगणार नाही,’ असा इशारा गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने केलेल्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. याबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘किरीट सोमय्या यांच्याकडे किती लक्ष द्यायचे, हे आता ठरवायची वेळ आली आहे. ते नेहमीच आरोप करीत असतात. कोणत्या तरी जुन्या गोष्टी काढायच्या आणि त्यावर आरोप करायचे, ही त्यांची सवय होऊन बसली आहे. त्यामुळे शिवसेना अशा तथ्यहीन आरोपांकडे फारसे लक्ष देत नाही. कोणी कितीही त्रास दिला, अडचणी आणल्या, तरी शिवसेना डगमगणार नाही,’ असेही ते म्हणाले.