हवामान बदलाचे दुष्परिणाम 8, 9 फेब्रुवारीला मंथन परिषद; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखत शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने दोनदिवसीय मंथन परिषदेचे आयोजन केले आहे. 8 व 9 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन होणाऱया या परिषदेचे  उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करून पर्यावरण संवर्धन साधताना शाश्वत विकासाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या दृष्टीने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्या पुढाकाराने, तसेच संपर्क संस्था, मुंबई आणि स्त्री आधार केंद्र, पुणे यांच्या वतीने मंथन परिषद आयोजित केली आहे. यात राज्यस्तरीय कृती आराखडय़ाची निश्चिती होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान झूमवरून पार पडणाऱया या परिषदेच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱहे असणार आहेत. हवामान बदल, पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करणारे तज्ञ , प्रियदर्शिनी कर्वे,  शुभदा देशमुख, शिरीष फडतरे, दिलीप गोडे, रमेश भिसे, संस्कृती मेनन, अपर्णा पाठक, विभावरी कांबळे या परिषदेत विचार मांडणार आहेत.

सदर परिषदेचे लाइव्ह प्रक्षेपण ‘नवी उमेद’ व स्त्री आधार केंद्राच्या  @streeaadharkendra या फेसबुक पेजवरून होईल. संपर्क – योगेश जाधव (9028333305/06) उमेदच्या मृणालिनी जोग (9820504781) स्त्री आधार केंद्र (streeaadharkarndra @gmail.co)