संस्कृतच्या उत्कर्षासाठी प्रयत्न व्हावेत, डॉ. कृष्णगोपाल यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यक्तीच्या पंचकोशांच्या विकासासाठी संस्कृतचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास संस्कृत अध्ययनाने परिपूर्ण होतो. संस्कृत भारतीच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृत भाषेच्या प्रसाराचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. देशाच्या सुवर्णमय भविष्याचा पाया संस्कृताधारित असावा असे आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांनी संस्कृतच्या उत्कर्षासाठी सतत प्रयत्नशील असायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात संस्कृत भारतीची अखिल भारतीय संपर्क बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत देशभरातून 55 कार्यकर्ते सहभागी झाले. बैठकीत आतापर्यंतचे कार्यवृत्त, पुढील लक्ष्य, दृष्टी, कार्ये आणि कार्यक्रमांविषयी चर्चासत्रे पार पडली. बैठकीचाच भाग म्हणून 9 ऑक्टोबरला संस्कृत भारती-दिल्ली, संस्कृत प्राच्यविद्या अध्ययन संस्थान (जेएनयू) आणि भारतीय ज्ञान प्रणाली विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत आणि आंतरिक विकास या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी  डॉ. कृष्णगोपाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्कृत भारतीचे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ञ प्रा. चांदकिरण सलुजा, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतीश्री धूलीपुडी पंडीत, भारतीय ज्ञान प्रणाली विभागाचे राष्ट्रीय समन्वयक मधुकेश्वर भट्ट, आयआयएम बंगळुरूचे प्रा. वी. महादेवन, प्रा. ओमनाथ बिमली, संस्कृत भारतीचे चमूकृष्णशास्त्र्ााr, दिनेश कामत यांची यावेळी उपस्थिती होती.