
जळगावातील बडं राजकीय व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या 40 वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात मी सक्रीय आहे. या जिल्ह्यात शून्यातून भाजपा उभा राहिला. लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. अनेक आमदार, खासदार निवडून आले. हे पक्षाचं यश तसंच नेतृत्वाचंही यश असतं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंनीभाजपावर हल्लाबोल केला.
‘जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. नाथाभाऊला नाउमेद केल्याशिवाय त्यांना यश मिळणार नाही हे विरोधकांना माहिती आहे. जिल्हा बँका, जिल्हा दूध संघ अनेक ठिकाणी विरोधकांना अपयश आले असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत सारे विरोधक एकवटून नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरलं आहे. परंतु जोपर्यंत जनता एकनाथ खडसेंच्या पाठिशी आहे तोपर्यंत सारे एकत्र आले तरी या विरोधकांना यश येणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी लाभो! एकनाथ खडसेंचं गणरायाला साकडं
राज्यातील सत्तासंघर्ष हा सर्वोच्च न्यायावलयात आहे. यावर कुठलाही निकाल लागलेला नाही. अजूनही राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री लवकर द्यावा अशी सदबुद्धी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गणरायानं द्यावी, असं साकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी घातलं.






























































