मिंधे सरकारने मोदींच्या गॅरंटीने महाराष्ट्राला कलंक लावला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
NANA-PATOLE

कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र व मुंबईचा आजवर मोठा नावलौकिक होता, पण नरेंद्र मोदी सरकारच्या शिंदे-फडणवीस-अजितदादांच्या सरकारने महाराष्ट्राला कलंक लावला, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली. विद्यमान सरकारने महाराष्ट्राला उत्तर प्रदेशच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे, असे ते म्हणाले. हिवाळी अधिवेशनात सरकारला यावर उत्तर द्यावेच लागले, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांचे ठाणे, गृहमंत्र्यांचे नागपूर, अजितदादांचे पुणे गुन्हेगारीत आघाडीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर आणि अजित पवारांचे पुणे शहर राज्यामध्ये गुन्हेगारीच्या बाबतीत आघाडीवर असल्याचेही नाना पटोले म्हणाले. दुसऱयांचे पक्ष फोडून खुर्ची मजबूत करण्यातून या तिघांनाही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ नसून राजकीय साठमारीत महाराष्ट्रात गुन्हेगारी बोकाळली आहे, याला वेळीच आळा घातला नाही तर गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.