
भरधाव मोटार चालक महिलेने दिलेल्या धडकेत निवृत्त नौदल अधिकार्याचा मृत्यू झाला. हा अपघात 5 फेबु्रवारीला सकाळी साडेदहाच्या सुमारास शास्त्रीनगरकडे जाणार्या रस्त्यावर घडला.
प्रकाशचंद्र लक्ष्मणराव तेलंग (वय 73 रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे ठार झालेल्या निवृत्त नौदल अधिकार्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रज्ञा तेलंग (वय 33) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रज्ञा यांचे सासरे प्रकाशचंद्र हे निवृत्त नौदल अधिकारी होते. रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास शास्त्रीनगर परिसरात ते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगातील मोटार चालक महिलेने त्यांना जबर ठोस दिली. त्यानंतर तिने प्रकाशचंद्र यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीररित्या जखमी झाल्याने प्रकाशचंद्र यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करीत आहेत.

























































