Breaking – महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता, दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

1213

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी 12 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली जाण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच हरयाणामध्येही निवडणुका होणार आहेत. तिथल्या निवडणुकीच्याही तारखा आज जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यांशिवाय झारखंडमध्येही निवडणुका होणार आहे. महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये ऑक्टोबर महिन्यात तर झारखंडमध्ये डिसेंबर महिन्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व फॉर्म्युले मीडियानेच तयार केलेत… दोन दिवस थांबा, सर्वकाही कळेल!!

विधासनसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेकडे एकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे डोळे लागले आहेत तर दुसरीकडे आचारसंहितेच्या धसक्याने मंत्रालयापासून स्थानिक स्वराज्य संस्थांत ‘कामे वाजवली’ जात आहेत. अलीकडच्या काळात मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांपासून अनुदान, निधी वाटप, बदल्या, नियुक्त्या, बढत्या आणि पदोन्नतीसंदर्भातील तब्बल 355 शासन निर्णय गेल्या तीन दिवसांत काढण्यात आले आहेत.

युती 100 टक्के होणार!

निवडणुकीच्या तोंडावर गेल्या तीन दिवसांत तब्बल 355 शासन निर्णय काढण्यात आले. 18 सप्टेंबरला 167 आणि 19 सप्टेंबरला 151 तर 20 सप्टेंबरला सायंकाळपर्यंत 37 शासन निर्णयांचे आदेश काढण्यात आले. निवडणुका कोणत्याही क्षणी लागण्याच्या शक्यतेने गेल्या महिनाभरात झालेल्या मंत्रिमंडळांच्या चार बैठकांत जवळपास 100 निर्णय घेण्यात आले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामे वाजवण्याची सर्वच विभागांत धावपळ उडाल्याचे दिसून येत असून मंत्रालयात सामान्य जनतेबरोबर प्रशासकीय अधिकाऱयांची गर्दी वाढली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा अवघ्या काही तासांनी होण्याची शक्यता असली तरी या निवडणुकीसाठी तिकीट मागणाऱ्यांचा उत्साह मात्र निवडणुकीपूर्वीच मावळल्याचे चित्र राजधानीत दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली मेगागळती हे यामागचे प्रमुख कारण असले तरी दुसरे एक तगडे कारणही इच्छुकांची भाऊगर्दी ओसरण्यास कारणीभूत आहे ते म्हणजे पितृपंधरवडा. काँग्रेसची अवस्था अगोदरच दयनीय झालेली असताना नेमक्या पितृपक्षातच स्क्रीनिंग कमिटीच्या बैठका असल्याने निवडणुकीची पूर्ण प्रक्रियाच पितृपंधरवडय़ात पूर्ण होणार असल्याने इच्छुकांनी नसती आफत नको म्हणून दिल्लीकडेच पाठ फिरवणेच पसंत केले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा 125-125 तर मित्रपक्षांना 38 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र मित्रपक्षांना हा फॉर्म्युला मान्य नाही. 55 ते 60 जागांची मागणी मित्रपक्षांकडून करण्यात येत असून ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडून आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. जागावटपाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच मित्रपक्षांची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन विकास आघाडी आदी मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या