निवडणूक रोख्यांतून भाजपला 1300 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला 2022-23 मध्ये एकूण 1300 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. याच काळात अशाच रोख्यांच्या माध्यमातून केवळ 171 कोटी मिळवणाऱया काँग्रेसपेक्षा भाजपला मिळालेला निधी 7 पटीने अधिक आहे. निवडणूक आयोगाला भाजपने पाठवलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालातून वरील माहिती उघड झाली आहे.

61 टक्के निधी निवडणूक रोख्यांतून भाजपला 22-23 या आर्थिक वर्षात मिळालेल्या एकूण 2120 कोटी रुपयांच्या निधीतील 61 टक्के निधी निवडणूक रोख्यांद्वारे उपलब्ध झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भाजपचे एकूण उत्पन्न 21-22 मध्ये 1,917 कोटी रु. इतके होते ते या आर्थिक वर्षात 2,361 कोटी रु. इतके वाढले आहे. 21-22 मध्ये भाजपला 1775 कोटी रुपयांचा एकूण निधी मिळाला होता. भाजपने 22-23 मध्ये व्याजातून 237 कोटी रुपये कमावल्याचेही सांगितले आहे. 21-22 मध्ये व्याजापोटी भाजपला 135 कोटी रु. मिळाले होते.