
दक्षिण, पश्चिम मुंबईसह उपनगरात वीजपुरवठ सुरळीत झाला आहे, ठाणे कळवा भागात अजूनही वीजपुरवठा बंद आहे. नवी मुंबईतही वीजपुरवठा सुरू झाला असून मुंबई हळूहळू पुर्वपदावर येत आहे.
आतापर्यंत 30 ते 40 टक्के वीजपुरवठा पूर्ववत झाला असून उर्वरित वीजपुरवठाही लवकरच पूर्ववत होईल. तसेच यापकरणी संपूर्ण चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल अशी माहिती उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.


























































