
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होणाऱ्या एलन मस्क (Elon Musk) यांना नुकतेच एका अभिनेत्रीसोबत पाहण्यात आले होते. या दोघांचा रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे ही अभिनेत्री एलन मस्क यांच्या आईची खास मैत्रिण असून त्यांनीच या दोघांची भेट घडवून आणल्याचे उघड झाले आहे.
एलन मस्क (वय – 50) आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बॅसेट (वय – 27) यांना सेंट ट्रोपेज येथे एकमेकांसोबत जेवण करताना कॅमेऱ्यात टिपण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये काहीतरी शिजतेय अशी चर्चा सुरू होती. अखेर या दोघे एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दोघे काही महिन्यांपूर्वीच एकमेकांना भेटले होते आणि तेव्हापासून ते डेट करत होते.

एलन मस्क यांची आई मये मस्क (Maye Musk) आणि नताशा बॅसेट (Natasha Bassett) या दोघी मैत्रिणी आहेत. दोघी 6 वर्षांपासून एकमेकांनी ओळखतात. नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिन्म फेस्टीव्हलमध्येही या दोघी एकमेकींशी हसून चर्चा करताना दिसल्या होत्या. नताशा हिनेच मये यांना या फेस्टीव्हलसाठी बोलावले होते. येथे नताशा हिच्या चित्रपटाचे स्क्रीनिंग होते आणि यासाठी तिने मये यांना बोलावले होते.

दरम्यान, 74 वर्षीय मये यांनीच एलन यांची नताशीशी भेट घडवून दिली होती. दोघेही एकमेकांना काही महिन्यांपासून डेट करत आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांना पहिल्यांदा एकमेकांसोबत पाहण्यात आले होते. लॉस एंजेलीसमध्ये दोघे मस्क यांच्या खासकी विमानातून उतरत असताना दिसले होते. त्यानंतर आता दोघेही लंच डेटवर गेल्याचे उघड झाले.

नताशी एलन मस्क यांच्यापेक्षा 23 वर्षांनी लहान आहे. विशेष म्हणजे मस्क यांनी याआधीही काही सेलेब्रिटींना डेट केले आहे. यात ब्रिटीश अभिनेत्री तलुलाह रिले, एंबर हर्ड आणि गायिका ग्रिम्स हिच्याही नावाचा समावेश आहे. मस्क हे सात मुलांचे वडीलही असून त्यांचा तीन वेळा घटस्फोट झालेला आहे.

























































