बोलला तुम्ही मोठे दिग्दर्शक असाल पण… सलमान साजिद खानवर संतापला

बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये विकेंडच्या वारी सलमान स्पर्धकांचा चांगलाच क्लास घेताना दिसतो. मात्र यावेळी सलमानच्या रडारवर साजिद खान होते. साजिद यांच्यावर सलमान प्रचंड संतापले असून त्यांनी त्यांची चांगलीच शाळा घेतील. शिवाय साजिदने स्वतच्या चूकांकडेही लक्ष द्यायला हवे असल्याची कानटोचणी केली.

यावेळीच्या विकेंडच्या वारमध्ये सलमानने घरातील सर्व स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. पण यात सलमानने अर्चना गौतम आणि साजिद खानवर निशाणा साधला होता. या आठवड्यात दोघांमध्ये वाद होताना दिसले. दोघांनी एकमेकांना शिवीगाळही केली आणि अखेर हातापायीपर्यंत पोहोचली. ‘बिग बॉस 16 ‘च्या विकेंड वारमध्ये सलमान खानने अर्चना गौतम आणि साजिद खान दोघांनाही त्याची बाजू मांडायची संधी दिली. त्यासोबतच त्यांच्या चूकाही सलमानने मोजायला सांगितल्या होत्या. साजिद अर्चना गौतमला बोलले होते, ते या शोमधून तिला काढू शकतात. कारण ते मोठे दिग्दर्शक आहेत. यावर अर्चनाही त्यांना चांगलेच सुनावले होते.

सलमानने साजिदला सांगितले की, तुम्ही मोठे दिग्दर्शक असाल, मात्र बिग बॉस चालवू शकत नाही आणि कोणीही अर्चनाला हटवू शकत नाही. मीही नाही. केवळ प्रेक्षकच ठरवू शकतात तिला ठेवायचे की नाही ठेवायचे. साजिद यांना वाटतं ते नेहमी बरोबर असतात. मात्र असे काही नाही. जेव्हा ते चुकीचे असतात त्यावेळी त्यांच्या मित्र आणि अन्य लोकांनी त्यांना सांगायला हवे. त्यांच्या चूका दाखवायला हव्यात.  त्यानंतर सलमानने साजिद आणि अर्चना दोघांना एकमेकांची माफी मागायला सांगितली आणि दोघांनी एकमेकांना मिठीही मारली.

रेशनिंग टास्कमध्ये साजिद खानने ‘किसी का बाप शो चलाता है’ अशी कमेंट केली होती. अर्चनाला वाटले की, साजिदने तिच्या वडिलांबाबत बोलला तेव्हा तिला राग आला आणि ती साजिदवर भडकली, ”माझे वडील इतके श्रीमंत असते तर ते चालवू शकले असते. तुम्ही तुमच्या बाबांना का सांगत नाहीत.” अर्चनाचे हे ऐकून साजिदचा संयम सुटला आणि त्यांनी अर्चनाला शिवीगाळ केली. यासोबतच ती भीक मागून शोमध्ये आल्याचेही ते बोलले होते. त्यामुळे बराच गदारोळ झाला होता.