
पीएफ खातेदारांना दिलासा देण्यासाठी ईपीएफओने पीएफ क्लेममध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच पीएफ काढण्याची प्रक्रिया ऑटोमेट केली जाणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर देशातील जवळपास 7 कोटी पीएफ खातेदारांना याचा फायदा मिळू शकरणार आहे. आतापर्यंत पीएफ खाते बंद करून पूर्ण रक्कम काढण्यासाठी काही आठवडे वाट पाहावी लागत होती. कधी कधी ‘केवायसी’मधील चुकांमुळे क्लेम अडकून पडायचा. परंतु आता क्लेमची प्रक्रिया आणखी सोपी आणि ऑटोमेटेड होणार आहे.
खातेदारांना नोकरी सोडल्यानंतर प्रॉव्हिडंट फंड काढण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागत होती. परंतु खातेदारांना दिलासा देण्यासाठी पीएफ काढण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान बनवण्यासाठी ईपीएफओने हालचाली सुरू केल्या.
ऑटो सेटलमेंट सुविधा
नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत ऑटो सेटलमेंट सुविधा सुरू केली जाणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर त्याच्या पीएफ खात्यात रक्कम ऑटोमेटिक ट्रान्सफर करणे आणि क्लेम ऑटो सेटलमेंट करण्यात येईल. या सुविधेचा देशातील 7 कोटींहून अधिक सदस्यांना लाभ मिळेल, अशी माहिती ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी म्हटले. नोकरी बदलणाऱ्यांनादेखील नव्या बदलांमुळे दिलासा मिळणार आहे.



























































