
आसाममध्ये सरकारी योजना किंवा पैशांच्या आधारे नव्हे तर विचारधारेनुसार मतदान होते. मुस्लिम मतदारांना 10 हजार किंवा 1 लाख रुपये जरी दिले, तरी ते मला मतदान करणार नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे.
सरकारी योजनांमुळे प्रत्येक नागरिक त्याच सरकारला मत देईल, हे मानता येणार नाही. मतदार हे त्यांची विचारधारा, भूमिका आणि राजकीय धारणा या आधारे मतदान करतात. राज्यात मुस्लीम लोकसंख्या वाढत असून हे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास इतर समुदायांची ओळख आणि सांस्कृतिक वारसा धोक्यात येऊ शकतो, असेही सरमा म्हणाले.



























































