भौतिक सूख वाढले तरी लोक आंदोलन करतात – मोहन भागवत

944

समाजात भौतिक सूख वाढले तरी लोक आंदोलन करत आहेत असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. अहमदाबादमध्ये एका व्याख्यानात ते बोलत होते. राजकीय पक्षांकडेपण सत्ता नसल्याने तेसुद्धा आंदोलन करत असल्याचे भागवत यांनी म्हटले.

अहमदाबमध्ये वर्तमानकाळातील जागतिक दृष्टिकोनातून हिंदुस्थानची भुमिका या विषयावर भागवत बोलत होते. ते म्हणाले की, “हिंदुस्थानने जगाला धर्म(ज्ञान) द्यावे त्यामुळे ज्ञान पसरले. त्यामुळे मनुष्य रोबोट होणार नाही. आम्ही वैश्विक कुटुंबाची चर्चा करतो वैश्विक बाजाराची नव्हे. तसेच आता भौतिक सुख वाढले आहे. तरी लोक असमाधानी आहेत आणि आंदोलन करत आहेत. मालक, नोकर, विरोधी पक्ष, सामान्य माणूस, विद्यार्थी शिक्षक सगळेच आंदोलन करत असून सगळेच नाखूश आहेत असे भागवत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या