
सामना ऑनलाईन । यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि सभापती सुभाष दुधे यांची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हत्या झाली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाले आहे. हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दारव्हामाधील बारीपुरा भागात रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी दुधे यांच्यावर सुरुवातीला लोखंडी रॉडने हल्ला केला आणि नंतर दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली. सुभाष दुधे यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.



























































