माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. एम्स रुग्णालयाने सांगितलं की, मनमोहन सिंग यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मनमोहन सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरात त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोष सिसोदिया यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी ट्वीट करून प्रार्थना केल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशभरात कोरोनाचे नवीन प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या