
अमरावती येथील छायाचित्रकार वैखरी सुनील यावलीकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. मानवी जगण्यातील भावभावनांचे छाया प्रकाशाच्या माध्यमातून उत्कट चित्रण बघण्याची संधी रसिकांना ‘द फ्रेम’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
व्यथा-वेदना, वैविध्यपूर्ण जीवनशैली, सामाजिक जाणिवांचा वेध, भावनिक साद घालणारा निसर्ग, कष्टकऱयांचे जगणे, तळागाळात घडलेले वास्तव, नॉस्टॅल्जिक करणाऱया वास्तू, परंपरा, विविध प्रसंग हे वैखरीच्या छायाचित्रांचे विषय आहेत. विविध रंग तसेच पांढऱया रंगापासून काळय़ा रंगापर्यंत असंख्य छटा तिच्या या छायाचित्रात अनुभवास येतात. प्रत्येक छायाचित्रात एक लय आहे नाद आहे . प्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल.























































