करिअर : नेत्रचिकित्सक व्हा!

प्रातिनिधीक फोटो

नेत्र चिकित्सक, ऑप्टोमिट्रिस्ट आणि ऑप्टिशियन ग्राहकांना नेत्र सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. याकरिता त्यांना नेत्रविज्ञान चिकित्सा शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. नेत्रविज्ञान चिकित्सकाला डोळ्यांच्या समस्या आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चिकित्सेची विशेष माहिती असते. डोळ्यांच्या आजारांचा शोध घेणे, त्यावर उपचार करणे, दृष्टी सुधारण्यासाठी डोळ्यांची सर्जरी आणि उपयुक्त चष्मा किंवा कॉण्टॅक्ट लेन्स लावावी असे उपाय तो सुचवतो. नेत्र चिकित्सक दृष्टिदोषांशी निगडित विविध प्रकारच्या सर्जरी करतात.

नेत्र चिकित्सकाचे प्रशिक्षण आणि आजारांचे शोध तसेच उपचार करण्याचा स्तर ऑप्टिमिट्रिस्ट किंवा ऑप्टिशियन या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ते क्लिनिक्स तसेच सामुदायिक सुरक्षा संस्थानात काम करू शकतात. सुसंगटितपणा, नेतृत्वक्षमता, धैर्य, जबाबदीरने काम करण्याची क्षमता, विज्ञान विषयाची आवड आणि उत्तम बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे अशा विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करीयरच्या विविध संधी आहेत.

नेत्र सर्जन

नेत्र सर्जन होण्यासाठी एमबीबीएसनंतर एम. एस. (नेत्रशास्त्र) होणे अनिवार्य आहे. याकरिता पदव्युत्तर शिक्षणानंतर ३ वर्षे रेसिडेन्सी प्रॅक्टिस आवश्यक आहे. पदवी तसेच डिप्लोमाच्या माध्यमातूनही हे प्रावीण्य मिळवता येते.

ऑप्टोमिट्रिस्ट किंवा ऑप्टिशियन

ऑप्टिशियन म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी ऑप्टोमिट्रीमध्ये पदवी शिक्षण घ्यावे लागते. बारावीला भौतिक, रसायन शास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांत किमान ५० गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी ऑप्टोमिट्रीमध्ये बीएससीसाठी पात्र असतात. विद्यार्थ्यांना ऑप्टोमिट्रीत प्रवेश घेण्यासाठी आय-सेट परीक्षा देणे बंधनकारक आहे.

पात्रता

नेत्रविज्ञान या विषयाशी संबंधित कोणत्याही विषयात प्रावीण्य मिळवायचे असल्यास एम.एस. वा एम.डी.नंतर प्राप्त करता येते.

संधी

सरकारी किंवा निमसरकारी रुग्णालये, स्वास्थ्य केंद्र, वैयक्तिक स्तरावर प्रॅक्टिस करता येऊ शकते.

 महाविद्यालये

> अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), दिल्ली.

> सशस्त्र बल चिकित्सा कॉलेज (ए.एफ.एम.सी.), पुणे.

> गुरुनानक नेत्र केंद्र, मौलाना आझाद चिकित्सा कॉलेज (एम.ए.एम.सी.), दिल्ली.

> क्षेत्रीय नेत्र विज्ञान

संस्थान (आर.आई.ओ.), अहमदाबाद.

आपली प्रतिक्रिया द्या