
देशात सोशल मीडियात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱया फेसबुकने वादग्रस्त पोस्टप्रकरणी भाजप नेत्यांना चांगलाच दणका दिला आहे. द्वेष आणि हिंसेला उत्तेजन देणारा मजकूर प्रसिद्ध करून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांचे फेसबुक अकाऊंट बंद करण्यात आले आहे. ‘द कॉल स्ट्रीट जर्नल’ने एक अहवाल प्रसिद्ध करत फेसबुकच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. फेसबुक भाजप व आरएसएसच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. विरोधकांच्या वाढत्या राजकीय दबावानंतर ‘हेटस्पीच’ प्रकरणात आता भाजप आमदार टी. राजा सिंह यांना फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.




























































