
फेसबुकद्वारे तरुणीने मैत्री केली. अमेरिका आर्मीमध्ये कॅप्टन पदावर असून अफगाणिस्थान पोस्टिंग वेळी भरपूर पैसा कमावला. तो पैसा हिंदुस्थानात व्यवसायात गुंतवायचा असल्याची बतावणी करीत एकत्र शॉपिंग मॉल सुरू करण्याच्या बहाण्याने एका तरुणाला 40 लाखांचा गंडा घातला. पण हे सर्व कटकारस्थान करणाऱ्या सात जणांच्या टोळीला डोंगरी पोलिसांनी दिल्लीत जाऊन पकडले.
प्रकाश जाधव (40) यांच्याशी फेसबुकवर एका तरुणीने मैत्री केली. तिने स्वतŠला अमेरिकन आर्मीत कॅप्टन असल्याचे व अफगानिस्तान पोस्टिंगवेळी भरपूर पैसा कमावल्याचे प्रकाशला सांगितले. त्या पैशातून आपण हिंदुस्थानात शॉपिंग मॉल सुरू करु, असे सांगत त्या तरुणीने प्रकाशला विश्वासात घेतले. मग हळूहळू पद्धतशीर तिने प्रकाशकडून पैसा काढायला सुरुवात केली. तिने 39 लाख 80 हजार रुपये प्रकाशकडून शिताफिने उकळले. दरम्यान, त्या तरुणीने आपली फसवणूक केल्याचे प्रकाशच्या लक्षात येताच त्याने डोंगरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. मग वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रकाश लिंगे, उपनिरीक्षक द्वारका पोटवडे व पथकाने गुह्याचा तपास केला.





























































