मोदींचा व्हिडीओ हटवल्याने ‘मेटा’ने मागितली माफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील एक व्हिडीओ हटवल्याने अखेर मेटाने दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. दिल्लीतील जेन-झी आंदोलना दरम्यान मोदींनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. मात्र काही काळानंतर हा व्हिडीओ फेसबुकवरून हटवण्यात आला होता. यावर केंद्र सरकारने नाराजी व्यक्त करत माफी मागा, असे म्हटले होते.

बुधवारी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बाल लैंगिक शोषणाचा कंटेट, डीपफेक आणि अल्गोरिदमच्या संचालनात झालेल्या गंभीर चुकांप्रकरणी अधिकृतरीत्या माफी मागितली आहे. मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. यावर आज मेटाने अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. तसेच काही विशिष्ट प्रकारच्या कंटेटला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात पैसे देण्यात आले होते, हेही मेटाने मान्य केले आहे. यासोबतच एका विशिष्ट प्रकारच्या कंटेटला प्रोत्साहन देण्यासाठी पैसे देण्यात आले होते. ही बाब कंपनीने चौकशी दरम्यान मान्य केली.

– केंद्रातील एका संसदीय समितीने तीन दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा, अशी मागणी केली होती. जर माफी मागितली नाही तर मेटाला हिंदुस्थानात मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षण आणि सवलतींचा विचार केला जाईल, असा इशारा दिला होता. तीन दिवसांची डेडलाईन संपायच्या आधीच मेटाने माफी मागितली आहे.