फेसबुकवर 35% तर इंस्टावर 86% हिंसक कंटेटमध्ये वाढ; कारवाई करताना कंपनी ‘मेटा’कुटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
social-media

‘मेटा’नं प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालानुसार, एप्रिलमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook वर Hate Speech म्हणजे द्वेषयुक्त कंटेटमध्ये सुमारे 37.82% वाढ झाली आहे आणि Instagram वर हिंसक आणि उत्तेजक कंटेटमध्ये 86% वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे अहवालातील बहुसंख्य कंटेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे युझर्सनी रिपोर्ट करण्यापूर्वीचा आहे.

31 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, फेसबुकला एप्रिलमध्ये 53,200 द्वेषयुक्त भाषणं आढळली, जी मार्चमध्ये आढळलेल्या 38,600 च्या तुलनेत 37.82% जास्त आहे, ज्यावर प्लॅटफॉर्मने कारवाई केली.

अहवालात असं दिसून आलं आहे की इंस्टाग्रामने मार्चमध्ये 41,300 च्या तुलनेत एप्रिलमध्ये 77,000 हिंसक आणि चिथावणीखोर संबंधित कंटेटवर कारवाई केली.

‘आम्ही कंटेटच्या भागांची संख्या मोजतो (जसे की पोस्ट, फोटो, व्हिडीओ किंवा कमेंट्स) आम्ही आमच्या निश्चित मानकं, नियमांविरुद्ध जाण्यासाठी कारवाई करतो. या डेटामुळे आमच्याकडून तात्काळ होणाऱ्या अंमलबजावणीचे प्रमाण दिसते’, असं मेटानं म्हटलं आहे.

‘कारवाई करण्यामध्ये Facebook किंवा Instagram वरून कंटेटचा एक भाग काढून टाकणे किंवा सूचना देऊन काही प्रेक्षकांना त्रास देणारे फोटो किंवा व्हिडीओ कव्हर करणे हे समाविष्ट असू शकते,’ असं अहवालात म्हटलं आहे.