
जेव्हा बाई गरोदर असते तेव्हा तिला बाळ गोरं होण्यासाठी आवर्जून केशर दूध पाजले जाते. तसेच नारळ पाणी पिण्याचेही सल्ले दिले जातात. पण केशर दूध किंवा नारळ पाणी प्यायल्याने खरंच बाळ गोरं होतं का?
DW हिंदी या युट्युब चॅनेलने याबाबत माहिती दिली आहे. दूध हे संपूर्ण आहार मानलं जातं. दुधामुळे लवकर पोट भरतं आणि दुधात शरीरासाठी लागणारी प्रथिनंही असतात. असे असले तरी दुधामुळे काही जणांना पित्ताचा म्हणजेच ऍसिडिटीचा त्रास होतो. अशा वेळी दूध न घेतलेले बरेच.
गरोदर बाईला दुध पिण्याचा सल्ला दिला जातो कारण दूध शरीरासाठी चांगले असते. केशरमध्ये अँटीऑक्साईड असतं. त्यामुळे हृदयसंबंधित आजार होत नाही. म्हणून दुधात केशर घातले जाते. केशर दूध आणि बाळाच्या रंगाच काही संबंध नसतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच नारळ पाणी प्यायल्यामुळे ऍसिडीटी होत नाही म्हणून गरोदर बाईला नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.































































